Shriram Shikshan Sanstha
स्थानिक श्रीराम शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम कला महिला महाविद्यालय येथे विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे 14 वे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी महाविद्यालयामध्ये संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये विदर्भातील आणि महाराष्ट्रातील नामवंत समाजशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि प्राध्यापक उपस्थित होते . या अधिवेशनाचा मुख्य विषय विदर्भातील ग्रामीण : समाज समस्या आणि आव्हाने हा असून विदर्भातील आणि देशातील ग्रामीण समाजाच्या समस्यांवर चर्चा, अभ्यास या परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.
अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून श्री सुभाषराव देशमुख सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून घनश्यामजी मेश्राम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नंदकिशोर राऊत यांनी केले तर अधिवेशनाचे बीजभाषक म्हणून डॉ. जगन कराडे यांनी विचार व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बी. एम. कऱ्हाडे मा. डॉ. किशोर राऊत मंचावर उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर या अधिवेशना करिता विविध अभ्यासकांनी आपले संशोधन निबंध वाचन केले. त्या सर्व विचारांचे संशोधन पत्रिकेच प्रकाशन यावेळी करण्यात आले. त्यानंतर प्रथम सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. प्रदीप मेश्राम, वक्ते डॉ. अशोक बोरकर उपस्थित होते, यावेळी ग्रामीण समाजामधील समस्या आणि आव्हाने यावर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येऊन समस्यांची मांडणी आणि त्यावर उपाय सुचविण्यात आले. दुसऱ्या सत्रामध्ये सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ.बी.एच.किर्दक वक्ते म्हणून डॉ. दया पांडे उपस्थित होत्या, या सत्रामध्ये ग्रामीण समाजातील शेतकऱ्यांची स्थिती त्यांच्या समस्या यावर चर्चा करण्यात आली.
भोजन अवकाशानंतर दुपारी तिसऱ्या सत्राला सुरुवात झाली या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. किशोर राऊत अमरावती विद्यापीठ अमरावती तर वक्ते म्हणून डॉ. रविंद्र विखार गडचिरोली हे उपस्थित होते .यावेळी समाजशास्त्रज्ञांनी ग्रामीण समस्यांवर कशाप्रकारे संशोधन केले पाहिजे यावर विचारमंथन झाले. संपूर्ण अधिवेशनाला महाराष्ट्र मधून चांगला प्रतिसाद मिळाला असून 100 पेक्षा जास्त समाजशास्त्राचे अभ्यासक यावेळी परिषदेला उपस्थित होते. त्यानंतर समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुभाषराव देशमुख संचालक श्रीराम शिक्षण संस्था तर अतिथी म्हणून डॉ. बी. एम. कऱ्हाडे, श्री विलासजी कडू, श्री किशोरभाऊ साकुरे, श्री प्रमोदजी मुंधडा उपस्थित होते.
यावेळी डॉ. नंदकिशोर राऊत यांनी अधिवेशनाचा अहवाल वाचून दाखविला. उत्कृष्ट पद्धतीने अधिवेशनाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले तर अध्यक्षांनी प्रथमच आपल्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले असल्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आणखी आयोजन करावे अशा सूचना केल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणभाऊ अडसड आणि आमदार मा. श्री. प्रतापदादा अडसड यांनी या अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुवर्णा घोपें तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश आडे, प्राध्यापक अभिजीत दोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. नितीन बिहाडे, डॉ. सुधीर पाथरे, डॉ. मोनाली इंगळे, डॉ. नीता केणे यांनी प्रयत्न केले. याकरिता महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी यामध्ये अजय कुलकर्णी, राजकुमार भैय्या, राजेश मारवे, संतोष शिसोदे, नागोराव पंचबुद्धे, शरद गवारले, कल्पनाताई चव्हाण, प्रफुल्ल कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रा.मिलिंद उबाळे, प्रा. दादाराव उईके, प्रा. डॉ. दीपा भगत आणि बहुसंख्य विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.